जळगाव (प्रतिनिधी) आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या बूथरचना सशक्तीकरण जिल्हा प्रमुखपदी योगेश देसले यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रदेश स्तरावरून जिल्हा निहाय बुथरचना सशक्तीकरण कार्यक्रम हाती घेतला आहे. काही दिवसांपूर्वी आ.एकनाथराव खडसे व आमदार अनिल भाईदास पाटील तसेच सुनील नेवे यांच्यावर विभागीय जबाबदारी देण्यात आली आहे.
तर प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते यांच्यावर जळगाव जिल्हा बूथ प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे पत्र आज जळगाव जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांनी दिले आहे. योगेश देसले यांनी युवक अध्यक्ष असतांना केलेले संघटनात्मक कार्य व त्यांचा जिल्ह्यात असलेला दांडगा जनसंपर्क व कामाचे सातत्य तसेच त्यांचा अनुभव याच दृष्टीकोनातून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.