पुणे (वृत्तसंस्था) कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोहम्मदवाडी परिसरात एका व्यक्तीने ४० वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. तु माझ्यासोबत अफेअर करून रिलेशनमध्ये रहा, असे बोलून महिलेचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी पीडित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपुर्व संजय भांबुरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ४० वर्षीय महिला आणि आरोपी हे एकाच परिसरात राहणारे आहेत. आरोपीने महिले सोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी महिला त्यांच्या सोसायटीच्या परिसरात फिरत असताना आरोपीने जवळ येऊन ‘तुझी फिगर खुप चांगलीय, तुझं लग्न झाल्यास मला काही त्रास नाही. तु माझ्यासोबत अफेअर करून रिलेशनमध्ये रहा’ असे बोलून महिलेचा विनयभंग केला. हा प्रकार जानेवारी २०२१ मध्ये घडला आहे. पीडित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता. कोंढवा पोलिसांनी महिलेच्या तक्रार अर्जाची दखल घेऊन चौकशी करुन आरोपी अपुर्व भांबुरे याच्या विरोधात रविवारी (दि.२९) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बर्गे करीत आहेत.