जळगाव (प्रतिनिधी) जून्या वादातून जाकीर अजित पटेल (वय ३९, रा. पटेल वाडा, ममुराबाद, ता. जळगाव) यांना दि. २९ रोजी रात्री साडेनऊ वाजता तिघांनी मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील पटेल वाड्यात जाकीर पटेल हे वास्तव्यास आहे. दि. २९ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जून्या भांडणाच्या कारणावरुन मुबारक उर्फ माया हाफीज पटेल, इलियास उर्फ इल्या रऊफ पटेल, इब्राहीम उर्फ गुड्डू पटेल (सर्व रा. पटेल वाडा, ममुराबाद) यांनी मारहाण केली. यामध्ये जखमी झालेल्या जाकीर पटेल याने तालुका पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ प्रकाश चिंचोरे हे करीत आहे.