जळगाव (प्रतिनिधी) येथील सुप्रीम कॉलनीतील ३५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात घराच्या वरच्या मजल्यावर संध्याकाळी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे एक महिन्या अगोदरच त्याच्या पत्नीने देखील गळफास घेतला हेाता.
यासंदर्भात अधिक असे की, सुप्रीम कॉलनीतील रहिवाीस जुबेर मोहम्मद हनीफ खाटीक (वय-३५) हा तरुण रिक्षा चालवून कुटूंबीयांचा उदनिर्वाह चालवत होता. पत्नी नजमाबी या देखील बचतगटाचे काम करुन कुटूंबाला हातभार लावत होती. बचतगटाचे कर्ज आणि भिशीची उसनावारी या मुळे नजमाबी यानी गेल्या महिन्यातच स्वयंपाक घरात गळफास घेत आत्महत्त्या केली हेाती. पत्नी नजमाचा मृत्यु होवुन एक महिना लोटत नाही तोवर, आज संध्याकाळी पाच वाजता जुबेर घरात एकटा असतांना त्याने वरच्या मजल्यावरील खोलीत ओढणीने गळफास घेत आत्महत्त्या केली. परिसरातील नगरसेवक सादिक खाटीक यांनी शेजार्यांच्या मदतीने जुबेरला खाली उतरवून तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केल. डॉ.निता पवार यांनी तपासणी करुन त्यास मृत घोषीत केले.