जळगाव (प्रतिनिधी) जुन्या भांडणाच्या कारणावरून राकेश यांना शिवीगाळ करीत कोयत्याने त्यांच्या पार्श्व भागावर जगन्नाथ पाटील (वय ३८, रा. बोरनार, ता. जळगाव) वार करीत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना दि. २८ डिसेंबर रोजी बोरनार येथे घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील बोरनार येथे काही जणांमध्ये जुना वाद असल्याने तो पुन्हा उफाळून आला. यातून राकेश पाटील यांना शिवीगाळ करण्यात येऊन धारदार कोयत्याने वार करण्यात आले. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी जखमीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून प्रेम गोपाल धनगर, चेतन, रोहित (दोघांचे पूर्ण नाव समजू शकले नाही) व एक अनोळखी अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघांकडून लाकडी दांडक्याने मारहाण
जळगाव तालुक्यातील बोरनार येथे चेतन किरण परदेशी (वय १९, रा. अमळनेर) या तरुणाला कृष्णा हरिदास कोळी व पवन रमेश कोळी यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत केली. तसेच राकेश किरण परदेशी याने मारण्यासाठी प्रोत्साहन दिले, अशी फिर्याद चेतन परदेशी याने दिल्याने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















