चाळीसगाव (प्रतिनिधी) युवा सैनिकांनी आता शिक्षण सेवा संघटन आणि रोजगार या क्षेत्रामध्ये अग्रेसर राहून समाजामध्ये काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. विद्यालयीन अडीअडचणी मध्ये विद्यार्थी मित्रांच्या मागे युवा सैनिकांनी उभे राहून अभ्यासपूर्ण त्यांच्या अडचणी सोडविल्या पाहिजेत असे प्रतिपादन चाळीसगाव येथे आयोजित युवा सेनेच्या मेळाव्यात युवा सेनेचे विस्तारक कुणाल दराडे यांनी केले.
त्याचबरोबर सिनेटच्या निवडणुकीसाठी पदवी धारकांचे नोंदणी फार्म भरून सिनेटच्या क्षेत्रात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिरकाव केला पाहिजे शिवसेनेची अंगिकृत संघटना असलेल्या युवा सेनेच्या महाराष्ट्रभर विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने हे अभियान राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून चाळीसगावात युवासेनेचा हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात युवती सेना विस्तारक प्रियंका पाटील यांनी देखील युवकांबरोबरच युवतींनी देखील युवासेनेच्या कार्यात सहभागी होऊन आपल्या कार्य क्षेत्राच्या कक्षा वाढवल्या पाहिजेत असे सांगितले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील युवा सेना सह सचिव विराज कावडिया, युवा सेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, चंद्रकांत शर्मा यांचीही समयोचित भाषणे झालीत. व्यासपीठावर शिवसेना शहरप्रमुख नाना कुमावत तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, विधानसभा क्षेत्र प्रमूख भीमराव खलाणे, संजय ठाकरे उपस्थित होते
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शैलेंद्र सातपुते, रवी चौधरी युवासेना शहर प्रमुख, निलेश गायके, हर्षल माळी, रॉकी धामणे युवासेना शहर संघटक, किरण आढाव, सुरेश पाटील, सागर पाटील, सागर चौधरी, शुभम राठोड, पिनोज काळे, गोरख कोळी, रोशन चव्हाण, महेंद्र कुमावत, पिनोज काळे तसेच यावेळी विशाल राजपूत, गोरख पाटील, नितीन पाटील, सोमा चौधरी, बबलू गोसावी, मुबारक पिंजारी, सनी चौधरी, सोनू पाटील, बाळा निकुंभ, प्रवीण चव्हाण, गणेश गिरी, किरण सोनवने अश्या ५० ते ५५ युवकांनी यूवासेनेत प्रवेश केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रशांत कुमावत यांनी तर सूत्रसंचालन महेंद्र जयस्वाल यांनी केले.