TheClearNews.Com
Saturday, October 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फालीच्या दुसऱ्या सत्रात सादर झाले ६८ कृषि बिझनेस मॉडेल्स व ६८ नावीण्यपूर्ण कृषि उपकरणे

जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, गोदरेजअॅग्रोवेटचे संचालक बुर्जीस गोदरेज यांची भेट

The Clear News Desk by The Clear News Desk
June 5, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जैन हिल्स येथे सुरू असलेल्या फाली अर्थात फ्युचर अॅग्रिकल्चर लिडर्स ऑफ इंडियाच्या दुसऱ्या सत्राच्या दुसऱ्या दिवशी सहभागी विद्यार्थ्यांनी कृषी व्यवसाय मॉडेल्सचे सादरीकरण केले. आकाश मैदानावरील डोम मध्ये ६८ नावीण्यपूर्ण (इन्होवेटिव्ह) उपकरणे मांडण्यात आलेले होते. यावेळी परीक्षक व सादरीकरण करणाऱ्या फाली विद्यार्थी यांच्यात प्रश्नोत्तराच्या स्वरुपात संवाद साधला गेला.

सकाळी ८ वाजता परिश्रम, बडीहांडा हॉल आणि गांधीतीर्थ सभागृहात ६८ कृषिव्यवसाय मॉडेल्सचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. मॉडेल्सचे सादरीकरण केले. आकाश मैदानावरील डोम मध्ये ६८ नावीण्यपूर्ण (इन्होवेटिव्ह) उपकरणे मांडण्यात आलेले होते. यावेळी परीक्षक व सादरीकरण करणाऱ्या फाली विद्यार्थी यांच्यात प्रश्नोत्तराच्या स्वरुपात संवाद साधला गेला. सकाळी ८ वाजता परिश्रम, बडीहांडा हॉल आणि गांधीतीर्थ सभागृहात ६८ कृषिव्यवसाय मॉडेल्सचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. ते सादरीकरण अभ्यासपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण असेच होते. एक कृषी व्यवसाय मॉडेल सादर करण्यासाठी तीन ते चार विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यात परीक्षक म्हणून बुर्जीस गोदरेज (संचालक, गोदरेज अॅग्रोवेट), अथांग जैन (संचालक, जैन फार्म फ्रेश फुडस् लि.), सरबजितसिंग (स्टार अॅग्री), तुषार त्रिवेदी (यूपीएल), किशोर रवाळे (जैन फार्म फ्रेश फुडस् लि.), शिवराम यदवल्ली (गोदरेज अॅग्रोवेट), जयप्रकाश लिखिते(समुन्नती), अजिंक तांदळे (यूपीएल), डॉ. बी.के. यादव (जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.), अभय यावलकर (रॅलिज इंडिया), सूरज पानपत्ते (स्टार अॅग्री), डॉ. अनिल ढाके (जैन इरिगेशन), श्रीमती जिज्ञासा (रॅलीज) यांचा समावेश होता.

READ ALSO

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

‘सेवा संकल्पा’ला गती; महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद!

६८ नावीण्यपूर्ण (इनोवेशन) उपकरणे

स्मार्ट शेती करायची असेल तर छोट्या छोट्या उपकरणांचा उपयोग करणे क्रमप्राप्त आहे. विद्यार्थ्यांनी आपली कल्पनाशक्तीचा पुरेपूर उपयोग करून ६८ नावीण्यपूर्ण इन्होवेटिव्ह उपकरणे तयार केली आहेत. त्याची मांडणी आकाश मैदानावरील एका डोम मध्ये करण्यात आली होती. अगदी स्मार्ट इरिगेशन पासून तर थेट पेरणी यंत्र, ड्रोनने फवारणीची पद्धत अशा एखाद दुसऱ्या नव्हे तर ६८ इन्होवेशन्सचा समावेश विद्यार्थ्यांनी केलेला होता. येणाऱ्या प्रत्येकाला हे विद्यार्थी त्याबाबत स्पष्टीकरण देत होते. परीक्षकांसह अभ्यासकांनी3 विद्यार्थ्यांच्या सर्व उपकरणांची माहिती घेतली व त्या उपकणाबाबत अधिक जाणून घेतले. आपले इनोवेशन व त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांनी पटवून सांगितले.

अनिल जैन व बुर्जीस गोदरेज इन्होवेशन उपकरणांना भेट –

जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, गोदरेज अॅग्रोवेटचे संचालक बुर्जीस गोदरेज, जैन फार्म फ्रेश फुडस् लि. संचालक अथांग जैन, स्टार अॅग्रीचे संचालक अमित अग्रवाल, फालीचे आयोजन करणाऱ्या नॅन्सी बेरी यांनी विद्यार्थ्यांच्या इन्होवेशन्स ला भेट दिली. त्यांनी मांडलेल्या उपकरणाची वैशिष्ट्ये, त्याची उपयोग करण्याची पद्धती, त्याच्या निर्मिती खर्च याबाबत जाणून घेतले.

फाली उपक्रमाला सौजन्य करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींचा पत्रकारांशी सुसंवाद –

नजिकच्या काळात फाली उपक्रमातून नव उद्योजक बनण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्यात येईल, विद्यार्थ्यांनी इंटर्नशिपची व्यवस्था करण्यात येईल, स्कॉलरशीप देण्यात येईल अशा माध्यमातून जास्तीत जास्त शिक्षित विद्यार्थी शेती करण्यासाठी सहभागी होती. फाली व्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी हे ज्ञान खुले व्हावे ह्यासाठी पोर्टल देखील सुरू करण्याची योजना आहे. अशी माहिती जैन इरिगेशन उपाध्यक्ष अनिल जैन यांनी दिली. स्टार अॅग्रीचे अमित अग्रवाल यांनी नजिकच्या काळात विद्यार्थ्यांना प्रॅक्टीकल देऊन गुणात्मकपणे त्यांची वाढ कशी करता येईल याबाबत सांगितले. गोदरेज अॅगओवेटचे संचालक बुर्जीस गोदरेज यांनी सांगितले की, गेल्यावर्षी आम्ही १० विद्यार्थ्यांना कंपनीत इंटर्नशिपसाठी घेतले होते. विद्यार्थ्यांची जाणून घेण्याची इच्छा व मेहनत घेण्याची वृत्ती खरोखरीच वाखाण्यासारखी आहे असे सांगितले. नॅन्सी बेरी म्हणाल्या की, काल पाच शेतकरी व भविष्यातील शेतीतले लिडर यांचा प्रेरणादायी संवाद झाला त्यातून एक चांगला बदल घडत आहे असे त्या म्हणाल्या. यावेळी फालीच्या पहिल्या संमेलना सहभागी मच्छिंद्र चव्हाण या विद्यार्थ्याने स्वतःचे पोल्ट्रीफार्म सुरू केले आहे व लाखो रुपयांची उलाढाल करत आहे याबाबत फालीचा माजी विद्यार्थी म्हणून देखील त्याने सुसंवाद साधला. पत्रकार परिषदेचे संचालन अनिल जोशी व रोहिणी घाडगे यांनी केले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

October 16, 2026
जळगाव

‘सेवा संकल्पा’ला गती; महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद!

October 16, 2026
अमळनेर

अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका

October 16, 2026
भुसावळ

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

October 16, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
कृषी

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

October 15, 2026
Next Post

खळबळजनक ! भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अतिवृष्टी अनुदानासाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड तलाठ्याकडे जमा करण्याचे आवाहन !

July 25, 2023

म्हाडा पेपर घोटाळा : विजय दर्जीला न्यायालयीन कोठडी ; इतर परीक्षांच्या घोटाळ्यातही सहभाग !

June 2, 2022

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विजयभाऊ महाजन यांचा उद्या अभिष्टचिंतन सोहळा !

February 2, 2023

खळबळजनक : लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

March 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group