जळगाव (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने यावल येथून गावठी पिस्तुलासह आज एका युवकाला अटक केली आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हेशाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन अशोक महाजन, शरिफ काझी, युनूस शेख, विनोद पाटिल, किशोर राठेाड, रणजीत जाधव यांच्या पथकाने यावल तालूक्यातील सुंदरनगरी भागातून यश राजेंद्र पाटिल यांच्या पथकाने यश राजेंद्र पाटील (वय-२०) याला ताब्यात घेत चौकशी करुन अंगझडती घेतली असता त्यांच्या कंबरेत पिस्तुल आढळून आले. तत्काळ त्याला अटक करुन यावल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.