जळगाव (प्रतिनिधी) रेल्वे स्टेशनवरुन दुचाकीने घराकडे जाणाऱ्या राहूल अशोक शिंदे (रा. चौघुले प्लॉट) या तरुणाची टोळक्याने दुचाकी अडविले. तसेच त्याला शिवीगाळ करीत काहीतरी वस्तूने त्याच्या डोक्यावर वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी रात्री पाऊण वाजेच्या सुमारास काट्याफाईल परिसरात घडली. याप्रकरणी हल्ला करणाऱ्या पाच जणांविरुद्ध शनिपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील चौघुले प्लॉट परिसरात राहणारा विजय शिंदे व गुरुनानक नगरात राहणारे निलेश हंसकर यांच्यामध्ये सन २०२० मध्ये शाब्दिक वाद झाले होते. तेव्हापासून त्यांच्यात वेळोवेळी वाद सुरु असून त्यांच्याविरुद्ध गुन्हे देखील दाखल आहेत. शुक्रवार दि. साडेअकरा वाजेच्या सुमारास आकाश शक्तीसिंग राजपूत व राहूल अशोक शिंदे हे दोघे त्यांच्या दुचाकीवरुन गप्पा मारत रेल्वे स्टेशन येथून काट्याफाईलमधून घराकडे जात होते. यावेळी सिद्ध निधाने व निलेश हंसकर याच्यासह दोन ते तीन जणांनी राहूल शिंदे याची गाडी अडवून त्याला मारहाण करु लागले. यावेळी आकाश राजपूत हा त्यांच्या आवरत असतांना मारहाण करणाऱ्यांनी त्याला शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली.
जखमी राहूल शिंदे याला त्याचा मित्र आकाशने दुचाकीवरुन तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पळून जातांना पकडून ठेवत डोक्यात केले वार
त्यांच्या तावडीतून सुटून राहूल शिंदे हा तेथून पळून जावू लागला. यावेळी सिद्धू निधाने याने त्याला खाली बसवून त्याच्या डोक्यात काहीतरी वस्तूने वार केले. त्याचवेळी निलेश हंसकर हा देखील त्याच्या गालावर काहीतरी वस्तूने मारुन गंभीर जखमी केले. आकाश राजपूत हा त्याठिकाणी गेला असता मारहाण करणारे तेथून पळून गेले.
पळून जातांना पकडून ठेवत डोक्यात केले वार