धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साळवा येथील एका ३१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात अधिक असे की, प्रविण धोंडु इंगळे (वय ३१ वर्षे रा, साळवा ता. धरणगाव) याने बंडु विठ्ठल ढाके (रा, साळवा ता.धरणगाव) यांच्या साळवा शिवारातील शेतातील बांधावरिल लिंबाचा झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. सकाळी साधारण ९ वाजेच्या सुमारास गावकऱ्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी धरणगाव पोलिसांनी कळवले. प्रविणला धरणगावच्या ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषीत केले. याप्रकरणी धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.ना. चंदुलाल सोनवणे हे करीत आहेत. दरम्यान, आत्महत्येचे नेमकं कारण समजून आले नाही.