धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील गुजराती गल्ली परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने आज गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. भुषण रंगराव बोरसे (वय ३६) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
यासंदर्भात भुषण बोरसे यांनी आज दुपारी पाच वाजेच्या सुमारास राहत्या घरातील वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. भूषण हा पी.आर.हायस्कूलचे सेवावृत्त शिक्षक आर.बी.बोरसे यांचा एकूलता मुलगा होता. भूषण हा धर्मिक वृत्तीचा होता. तो नियमित स्वामी समर्थ केंद्रात जायचा. त्यांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान यासंदर्भात संजय माधवराव जाधव (रा.चिंतामण मोरया, धरणगाव) यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.