भुसावळ ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील कपिल वस्तीनगर ते दीपनगर महामार्गावर १३ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ट्रक व दुचाकीचा भीषण दुचाकीचा झाला. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला असून त्याच्या मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला आहे.
या संदर्भात कपिल वस्ती नगरमधील साजन संजय वानखेडे (वय १९) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, विजय पांडुरंग सुरडकर हा त्याच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या टिव्हीएस कंपनीच्या रायडर दुचाकीवरून एक जखमी मद्याच्या नशेत जात होता. दुचाकी चालवताना त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि पुढे जाणाऱ्या ट्रकच्या मागील बाजूस दुचाकीचे जबर धडक दुचाकीवरून साजन वानखेडे खाली फेकला गेला व त्याचा जागीच मृत्यू झाला. तर फिर्यादी साजन वानखेडे हे जखमी झाले आहेत. या अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पूजा संजीवनी अंधारे करत आहेत.
















