भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कजगाव येथील तरुण अक्षय रत्नाकर सोनार (वय २९) याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, अक्षयच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी मन हेलावून सोडणारा आक्रोश केला.
वाढत्या तापमानामुळे शनिवारी संध्याकाळी अक्षय सोनार याला अस्वस्थ वाटू लागले. यानंतर चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अक्षय हा सुवर्णकार समाजाचे माजी अध्यक्ष रत्नाकर सोनार यांचा थोरला मुलगा होता. मृत अक्षयच्या पश्चात दीड वर्षाचा मुलगा, पत्नी, आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.
अक्षयचा दीड वर्षीय मुलगा आपल्या वडिलांना आर्त हाक देत होता. मृताच्या पत्नी, आई, वडील, व भावांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता. दरम्यान अक्षयला श्रद्धांजली म्हणून सुवर्णकार समाज बांधवांनी तसेच संपूर्ण सराफ बाजारातील व्यावसायिकांनी आपली आस्थापने बंद ठेवली होती.