TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

झंवरला ‘ती’ चूक पडली महागात ; पोलिसांनी सिनेस्टाईल ४३० कि.मी पाठलाग करून पकडले !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 10, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरने आपल्या जुन्या मोबाईलमध्ये अवघ्या तासाभरासाठी नवीन सीम कार्ड टाकले आणि हीच चूक त्याच्या अटकेसाठी कारणीभूत ठरली. विशेष म्हणजे पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मागील १० दिवसात झंवरचे १५०० पेक्षा जास्त वेळा वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन शोधून काढले. एवढेच नव्हे तर इंदोर ते नाशिक असा ४३० कि.मी सिनेस्टाईल पाठलाग करून झंवरला अखेर नाशकात अटक केलीच.

पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर सापळा रचून नाशिक येथून अटक केली आहे. दरम्यान, तत्पूर्वी पोलिसांचे पथक दहा दिवसापासून झंवरच्या मागावर होते. त्यानंतर रात्रभर पद्धतशीरपणे सापळा रचल्यानंतर आज सकाळी १०:३० वाजता पंचवटी परिसरातून त्याला अटक करण्यात आली. बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.

READ ALSO

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

१० दिवसात १५०० पेक्षा जास्त मोबाईल क्रमांकाचे लोकेशन शोधले

मागील काही १० दिवसापासून पोलिसांना झंवरचा सुगावा लागलेला होता. झंवर फरार असल्यापासून सतत मोबाईल आणि सीम कार्ड बदलत होता. तसेच तो जास्तीत जास्त डोंगलचा वापर करुन बोलत होता. त्यामुळे पोलिसांना त्याचा माग काढणे कठीण जात होते. अशा परिस्थितीत कोणताही धागेदोरे नसताना झंवरला शोधण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक प्रयत्न करत होते. पोलिसांनी मागील १० दिवसात १५०० पेक्षा जास्त वेळा वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन काढून त्यातील जास्तीत जास्त लोकेशन्सला भेट देऊन झंवरचे वास्तव्याचे ठिकाणी झाडाझडती घेतली. तसेच पोलिसांनी ५० हुन अधिक आयएमइआय (IMEI) चेक केले तसेच ५० हुन अधिक मोबाईल क्रमांकचे सिडीआर, एसडीआर चेक केले.

पोलिसांचा १० दिवसात २५०० कि.मी पेक्षा जास्तीचा प्रवास

पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने झंवरला शोधण्याकरिता १० दिवसात २५०० किमी पेक्षा जास्त प्रवास केला. १० दिवस वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये राहून वाहन व आम्ही स्वतःची ओळख लपवून तपास केला. विशेष म्हणजे इंदोर ते नाशिक असा ४३० किमी पाठलाग करून शोध घेत-घेत झंवरला ताब्यात घेतले. इंदोरहून निघाल्यानंतर झंवर वापरत असलेल्या डोंगलचे लोकेशन धुळ्याच्या दिशेने जात असल्याचे पोलिसांना कळले. त्यानंतर रात्री साधारण २ ते ३ वाजेच्या दरम्यान, झंवर पंचवटी परिसरातील एका उच्चभ्रू वस्तीत शिरला. पोलिसांनी रात्री परिसर पिंजून काढायला सुरुवात केली. या परिसरात सकाळी पोलिसांना एक संशयास्पद कार आढळून आली. पोलिसांनी लागलीच कारची माहिती काढली असता ती कार सुनील झंवरचा मुलगा सुरज झंवर वापरत असल्याचे लक्षात आले.

सकाळी ८ वाजेनंतर झंवर आला गोत्यात

सुरज झंवर वापरत असलेल्या कार जवळ पोलिसांनी गस्त घालायला सुरुवात केली. सकाळी ८ वाजेच्या सुमारास सुनील झंवरचा ड्रायव्हर कारमधून एक बॅग काढायला आला. त्यानंतर पोलिस ड्रायव्हरच्या मागेच राहिले. त्यामुळे सकाळी ८ वाजेनंतर झंवर खऱ्या अर्थाने गोत्यात आला. साधारण १०:३० वाजेच्या सुमारास सुनील झंवर आपल्या नातेवाईकच्या घरातून बाहेर पडला. विशेष म्हणजे झंवर पुन्हा कार बदलवून वेगळ्या ठिकाणी फरार होण्याच्या तयारीत होता. परंतू तत्पूर्वीच पोलिसांनी त्याला घेरत ताब्यात घेतले.

अहमदाबाद, उज्जेनमधून निसटला नाशकात मात्र अडकला

सुनील झंवरने जुन्या मोबाईलमध्ये नवीन सीमकार्ड टाकल्यानंतर तो पोलिसांच्या रडारवर आला होता. परंतु तेव्हा पासून तो सतत राहण्याचे ठिकाण,मोबाईल, कार बदलवत होता. सुरुवातीला अहमदाबाद नंतर झंवर उज्जेन पोहचला. इंदोरला तो एका उच्चभ्रू परिसरात वास्तव्यास थांबला. परंतू एवढ्या मोठ्या परिसरातून त्याला शोधणे कठीण होते. त्यानंतर मात्र, पोलिसांनी इंदोर पासून डोंगलच्या लोकेशनवरून झंवरचा पाठलाग करायला सुरुवात केली. साधारण ४३० किलो मीटरचा प्रवास केल्यानंतर काल रात्री झंवर नाशिक येथे पोहचला आणि पोलिसांच्या सापळ्यात अडकला.

ते घर झंवरच्या मामाचे

सुनील झंवर पंचवटी परिसरात कुणाच्या घरात राहत होता. याची चर्चा सकाळपासूनच सुरु होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार ते घर सुनील झंवरच्या इंदानी नामक मामाचे आहे. परंतू झंवरला घराच्या बाहेर पडल्यानंतर कारमधून पळून जाण्याच्या तयारीत होता.

विजय वाघमारे (9284058683)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
Next Post

महाराणा प्रतापांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा ; चाळीसगाव उपमुख्याधिकार्‍यांना निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : डंपर -ट्रॅक्टरचा भीषण अपघात ; तरुण ठार, तीन जण जखमी

January 25, 2025

परभणीत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी १७ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या

January 1, 2022

Horoscope Today : आजचं राशीभविष्य – शनिवार, १८ मे २०२४ !

May 18, 2024

नदीपात्रात विजेचा शॉक लागून एकुलत्या एक भावाचा मृत्यू ; पाच बहिणींचा काळीज चिरणारा आक्रोश !

June 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group