बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील कुऱ्हा हरदो येथे दहा दिवसांपूर्वी गावाजवळील नाल्यात एक माकड जखमी अवस्थेत गावकऱ्यांना दिसले. त्याच्यावर औषधोपचार केले पण ते वाचू शकले नाही. नवरात्रीच्या काळात माकडाचा मृत्यु झाल्याने त्याच्यावर उपचार करणाऱ्या गावकऱ्यांना वाईट वाटले व त्यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
गावकऱ्यांनी एखादा कुटुंबातील व्यक्ती वारल्या नंतर जसे दहावे करतात तसे विधिवत माकडाचे दहावे केले. पुरुषांनी मुंडण करून माकडास श्रद्धांजली अर्पण केली. जीवन सोनवणे, सुरेश माळी, वामन ताठे, विश्वनाथ माळी,प्रमिला माळी, आंनदा कोळी, रेखा कोळी, वैशाली माळी, कृष्णा रोकडे,संजय माळी, अमोल माळी, सुलाबाई माळी, श्रीराम वानखेडे, रुपाली वानखेडे, निलेश माळी, कविता माळी, सुरेश माळी, गणेश माळी, सुरेश कोळी, बाबूराव कोळी, गजानन डोंगरे, दिपक रोकडे.या गावकऱ्यांनी या माकडाचे रामदूत म्हणून श्रद्धे पोटी हे केले.