जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कुसुंबा येथे एका ३२ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार युवकाने आत्महत्या केली असून एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की देवकर इंजिनिअरिंग कॉलेज तथा शासकीय आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये कुसुंबा येथील अवधूत गंभीर पाटील (वय ३२ वर्ष) यांच्या नातेवाईकांनी मयत स्थितीत दाखल केले होते. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अवधूत पाटील यांचा मृत्यू पाण्यात बुडाल्यामुळे झाला आहे. यासंदर्भात डॉक्टर रेणुका भंगाळे यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक शिवदास चौधरी हे करीत आहे. दरम्यान, प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार अवधूत पाटील यांनी आत्महत्या केली आहे. परंतू आत्महत्येचे नेमकं कारण समजू शकले नाही.