TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एकनाथ खडसेंना ‘ईडी’ने नोटीस बजावल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची केंद्र सरकारच्या विरोधात निर्देशने

The Clear News Desk by The Clear News Desk
December 27, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांना भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणात ईडी (सक्तवसुली संचालनालय)ने समन्स बजावले आहे. त्यांना येत्या ३० डिसेंबर राेजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. भाजपकडून सूडाचे राजकारण केले जात असून, खडसेंना आलेली ईडीची नोटीस हा त्यातलाच एक भाग आहे, असा आरोप करत जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी पक्ष कार्यालयात केंद्र सरकारच्या विरोधात निर्देशने केली.

भोसरी इथं भूखंड खरेदी प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना महसूल मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर चार वर्ष खडसे यांना मंत्रिपदापासून दूर राहावे लागले. याच प्रकरणी आता खडसे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. मात्र, हा सर्व प्रकार सुडाच्या राजकारणासाठी भाजपकडून सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.

READ ALSO

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

एकनाथ खडसे यापूर्वी भाजपमध्ये होते. त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी ईडी लावली तर सीडी लावणार असल्याचे वक्तव्य केले होते. भोसरी भूखंड प्रकरणी याआधीही चार वेळा आपली चौकशी झाली आहे. आता ED पाचव्यांदा चौकशी करणार आहे. ED ला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं खडसेंनी सांगितलं. भोसरीतील एमआयडीसीतील भूखंडाच्या व्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने एकनाथ खडसे यांना चौकशीची नोटीस बजावली आहे. ३० डिसेंबर रोजी त्यांना मुंबईतील कार्यालयात चौकशीकामी उपस्थित रहावे लागणार आहे. ही बाब स्वतः खडसेंनी काल (शनिवारी) पत्रकारांशी बोलताना सांगितली.

यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात एकत्र येत भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनील माळी, वाल्मीक पाटील, प्रदीप भोळे, अजय बढे आदी उपस्थित होते. यावेळी भाजप व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘मोदी सरकार हाय हाय’, ‘ईडी झाली येडी’, ‘भाजप सरकारचा निषेध असो’, अशा घोषणा देत जोरदार निदर्शने करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील म्हणाले की, भाजपकडून सुडाचे राजकारण केले जात आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला जात आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम भाजप करत असून, हे खपवून घेणार नाही. भोसरीतील भूखंडाच्या व्यवहाराची यापूर्वी एसीबी, अँटी करप्शन तसेच झोटिंग समितीने सखोल चौकशी करून खडसेंना क्लीनचिट दिली आहे, असे असताना आता पुन्हा या प्रकरणाची चौकशी करणे योग्य नाही. ईडीने खडसेंना काढलेली नोटीस त्वरित मागे घ्यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अभिषेक पाटील यांनी दिला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
Next Post

कासोदा येथील आजी-माजी सरपंच व सदस्यांची मोर्चेबांधणी सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कांताई सभागृहात ९ जुलै रोजी लतादीदींच्या गीतांचा “घरंदाज सूर” कार्यक्रम !

July 6, 2022

उद्धव ठाकरे आमचे नेते ; त्यांना आम्ही कुठलंही प्रत्युत्तर देणार नाही : दीपक केसरकर 

July 2, 2022

धरणगाव येथे दर्शन ट्रेनिंग इन्स्टिट्युटतर्फे नियुक्ती पत्र वाटप व रोजगार मेळाव्याचे आयोजन !

September 12, 2024

अखेर महाराष्ट्रात शाळेची घंटा वाजणार ; ठाकरे सरकारकडून शासन निर्णय जारी

July 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group