मुंबई प्रतिनिधी । खासगी प्रयोगशाळांनी करोनासाठीच्या आरटीपीसीआर तपासणी दरामध्ये कपात करून नागरिकांना दिलासा दिला आहे. घरी येऊन करायच्या चाचण्यांचे दर हे पूर्वीपेक्षा 500 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत.
आता घरी येऊन करायच्या आरटीपीसीआर चाचणीचे दर हे 2 हजार रुपये निश्चित करण्यात आले आहेत. यापूर्वी ते 2500 रुपये होते. आरटीपीसीआर चाचणीसाठी वापरण्यात येणारा पीपीई, प्रवास खर्च, किट याचा एकत्रित खर्च यात अंतर्भूत आहे. ज्या ठिकाणी नमुने गोळा करण्यात येतात, त्या ठिकाणांहून ते प्रयोगशाळांमध्ये तपासण्यासाठी आणण्याचा खर्च 1900 रुपयांवरून 1200 रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. तर कोविड काळजी कक्ष, प्रयोगशाळा, रुग्णालयांमधून नमुने गोळा करून ते तपासणीसाठी आणण्याचा खर्च 2200 रुपयांवरून 1600 रुपये इतका ठरवण्यात आला आहे.