मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथराव खडसे यांच्याविषयीची कोणतीही चर्चा आजच्या बैठकीत झाली नाही. राष्ट्रवादीच्या बैठकीत जळगाव जलसिंचन प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक आज मुंबईत झाली. यात भाजपचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत निर्णय होण्याची चर्चा होती. परंतू याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता एकनाथराव खडसे यांच्या नाराजीबाबत ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाने विचार करावा. तसेच भविष्यात खडसे राष्ट्रवादीत येतील का, या प्रश्नावर जयंत पाटील यांनी, राजकारणात जर-तरला फार महत्व नसते, असे म्हणत उत्तर देणे टाळले.