हाथरस (वृत्तसंस्था) सामुहिक बलात्कार केल्यानंतर पिडीत अल्पवयीन मुलीची जीभ कापल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये घडली आहे.
हाथरसच्या चंदपा परिसरातील एका गावातील चार तरुणांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर आरोपींनी मुलीला मारहाण केली. त्यानंतर तिची जीभ कापली. इतकेच नाही तर, तिची गळा आवळून हत्या करण्याचाही प्रयत्न केला. पीडितेवर अलीगढच्या रुग्णालयात उपचार सुरू असून घटनेच्या नऊ दिवसांनंतर मुलगी शुद्धीवर आली. त्यानंतर तिने घडलेली घटना सांगितली. तिच्या जबाबानुसार, पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. त्याच्याविरोधात बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, काही दिवसांनी त्याला सोडून दिले. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईबाबत संताप व्यक्त केला जात आहे.