जळगाव (प्रतिनिधी) आज जिल्ह्यात आज ११९ जणांना कोरोनाची बाधा झाली असून २५५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात करुन सुखरुप घरी परतले आहेत. यानिमित्ताने कोरोनाबाधीतांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या मागील काही दिवसाप्रमाणे आजही जास्त आहे. यामुळे आरोग्य प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, एरंडोल, पारोळा तालुक्यात आज एकही कोरोनाबाधित आढळलेला नाहीय.
आजची आकडेवारी
जळगाव शहर – ४१, जळगाव ग्रामीण-०२, भुसावळ- ०६, अमळनेर-०४, चोपडा-०३, पाचोरा-०६, भडगाव-०७, धरणगाव-०३, यावल-१७, एरंडोल-००, जामनेर-०७, रावेर-०५, पारोळा-००, चाळीसगाव-१४, मुक्ताईनगर-०२,बोदवड-०१ आणि अन्य जिल्हा ०१ असे एकुण ११९ रूग्ण आज आढळून आले आहेत.