भुसावळ- (प्रतिनिधी) सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून नऊ लाख 30 हजार रुपयांत दोन भावंडांची फसवणूक केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात एका व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिरोज सिकंदर तडवी (रा. लक्ष्मीनारायण नगर भुसावळ) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध एक महिन्यापूर्वी अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे.
आरोपी फिरोज सिकंदर तडवीने दिनांक 18 जुलै 2013 ते 15 डिसेंबर 2013 दरम्यान आपले वडील सिकंदर तडवी हे तहसीलदार व उपजिल्हाधिकारी असल्याचे सांगून येथील नेमाडे कॉलनीतील रहिवासी जावेद रफिक तडवी (वय 40) व लहान भाऊ सलीम यांना सरकारी नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवूनत्यांच्या वडिलांकडून नऊ लाख 30 हजार रुपये घेतले. परंतू अद्यापपर्यंत नोकरी लावून न दिल्याने जावेद रफिक तडवी यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीसात फिरोज तडव (वय 40, रा.नेमाडे कॉलनी) यांच्या फिर्यादीवरून गुरनं 838 /20 भादंवि 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रभारी पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मंगेश गोटला तपास करीत आहे. आरोपी फिरोज तडवी याने मयत पतीच्या नावे असलेल्या २९ लाखांची विमा रक्कम काढून देण्यासाठी नऊ लाख रुपये घेऊन रक्कम बनावट चेकद्वारे काढून घेतली होती. याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून जुलै महिन्यात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.