जळगाव (प्रतिनिधी) रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार भावंडांच्या हत्याकांडाची घटना गंभीर आहे. यातील एका १४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती नुकतीच माहिती समोर आली आहे. ही घटना गंभीर आहे. पोलिसांनी जिल्ह्यातील अवैध धंदे बंद केले पाहिजेत आणि बोरखेडा हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केली आहे.
एकनाथराव खडसे पुढे म्हणाले की, रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार भावंडांच्या हत्याकांडाची घटना गंभीर आहे. यातील एका १४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती मला मिळाली आहे. ही घटना गंभीर आहे. पोलिसांनी तत्काळ आरोपींना अटक केली पाहिजे. तसेच असे गुन्हे सातत्याने घडणार नाहीत, याबाबत उपाययोजना केल्या पाहिजेत. कायदा सुव्यवस्था ढासळत चालली आहे. पोलिसांनी जिल्ह्यातील अवैध धंदे बंद केले पाहिजेत. थोडी कारवाई केल्यानंतर पुन्हा अवैध धंदे सुरु होतात, असं व्हायला नको. तसेच बोरखेडा हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी देखील खडसे यांनी केली आहे. तर जिल्ह्यात अलीकडच्या काळात कायदा-सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोपही खडसे यांनी केला आहे.
















