आंध्र प्रदेश (वृत्तसंस्था) एका कुटुंबातील महिलेवरती तीन नराधमांनी त्या महिलेच्या पती आणि मुलांसमोरच तिच्यावरती सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही संतापजनक धक्कादायक घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे.
आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील एक महिला आपल्या पती आणि मुलांसह रात्रीच्या वेळी रेपल्ले रेल्वे स्टेशनमध्ये एका रेल्वेतून उतरले. मात्र, त्यांना मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे रेल्वे स्थानकातून पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी वाहन मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी रेपल्ले रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवरील बाकावर झोपले असता रात्री एकच्या सुमारास तिघेजण दारूच्या नशेत त्यांच्याजवळ आले त्यांनी पीडितेकडील पैसे हिसकावून घेऊन तिच्या नवऱ्यालाही मारहाण केली. हे नराधम एवढ्यावरच न थांबता त्यांनी महिलेच्या केसांना धरून तिला ओढत घेऊन गेले आणि तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती बापटला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वकुल जिंदाल यांनी दिली.
तसंच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पती आरोपींकडे मदतीची याचना करत होता, मात्र त्याचा काहीही परिणाम त्यांच्यावर झाला नाही. दरम्यान, पीडितेचा पतीने रेल्वे स्टेशनबाहेर धाव घेत जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांने पोलिसांची मदत घेतली, पोलीस रेल्वे स्टेशनला पोहोचेपर्यंत आरोपी फरार झाले होते. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करून श्वानपथकाच्या मदतीने काही तासांतच या तिन्ही नराधम आरोपींना अटक केली. विजयकृष्ण वय वर्ष २४, निखिल वय वर्ष २५ अशी दोन आरोपींची नावे असून तिसरा आरोपी अल्पवयीन असून त्याच्यावर यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल आहेत.