जळगाव प्रतिनिधी । भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्याच्या उत्तर महाराष्ट्र कायदेशीर सल्लागारपदी ऍड.प्रविण नरेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भ्रष्ट्राचार विरोधी, जनआक्रोश, महाराष्ट्र राज्याचे उत्तर महाराष्ट्र कायदेशीर सल्लगारपदी ऍड.प्रविण पाटील अध्यक्ष बंटीभाऊ नेवलेकर यांची स्वाक्षरी असलेले नियुक्ती पत्र ऍड.पाटील यांना प्राप्त झाले आहे. आगामी तीन वर्षासाठी ही नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून भ्रष्टाचर विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष व संपर्कप्रमुख संतोष कांबळे यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.