TheClearNews.Com
Wednesday, September 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची बिलाखेड शिवारातील जागा बेकायदेशीर ? माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या दाव्याने खळबळ

चाळीसगावचे अप्पर जिल्हाधिकारी व आरटीओ कार्यालय देखील धोक्यात ?

vijay waghmare by vijay waghmare
April 14, 2026
in चाळीसगाव, विशेष लेख, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – गिरणा नदीमधील अवैध वाळू उपसा थांबवावा यासाठी माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात बोलताना उन्मेष पाटील यांनी केलेल्या एका दाव्यामुळे चाळीसगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. चाळीसगाव येथे मंजूर करण्यात आलेल्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारती साठी जवळपास १५० कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे मात्र सदर इमारत ज्या बिलाखेड शिवारात शासकीय जागेत उभारण्यात येणार आहे त्या जागेच्या बाबतीतच उन्मेष पाटील यांनी दावा केला आहे की सदर जागा मी आमदार असताना शासनाकडे मागितली असता त्यांनी ती वनविभागाची पाश्चर फॉरेस्ट असून गौताळा अभयारण्याच्या प्रभावक्षेत्रात असल्याचे लेखी उत्तर दिले होते मात्र आता त्याच जागेवर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी इमारत मंजूर करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी लोकांना न्याय मिळाला पाहिजे तीच इमारत बेकायदेशीर जागेवर उभी राहिली तर लोकांना न्याय मिळणार नाही व तिथे लोक नाही तर भूत जातील असा खोचक टोलाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लगावला. खोटी कागदपत्रे करून सदर जागा मिळवली आहे का अशी शंका असून त्याचा तपास महसूल विभागाने करावा, मी देखील त्याचा पाठपुरावा करत आहे असे त्यांनी सांगितले तसेच याच जागेवर चाळीसगाव येथे मंजूर झालेले नवे आरटीओ म्हणजे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीचे काम सुरू करण्यात आले आहे. ते काम देखील बेकायदेशीर जागेवर असल्याने शासनाचे कोट्यवधी चे नुकसान होणार असल्याचे उन्मेष पाटील यांनी म्हटले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

READ ALSO

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 सप्टेंबर 2026 !

बिलाखेड शिवरात्री आयुक्त पशुसंवर्धन विभाग यांच्या नावे असणाऱ्या गट क्रमांक २७५ व १८८ मधील जवळपास ९.०९ हेक्टर जागा काही दिवसांपूर्वीच शासनाने माननीय प्रमुख न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय, जळगाव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चाळीसगाव, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित चाळीसगाव व ईतर यांच्या नावाने वितरित केली होती. चाळीसगाव येथील प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालय देखील याच ठिकाणी प्रस्तावित आहे. तसेच सदर जागेवर सद्यस्थितीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे काम युद्धपातळीवर सुरू असून या जागेवर १५० कोटींचे नवीन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय इमारत मंजूर झाली आहे यासोबतच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीसाठी देखील जागा राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र सदर जागाच बेकायदेशीर असल्याचा दावा उन्मेष पाटील यांनी केला आहे.

उन्मेष पाटलांच्या हा दावा खरा ठरल्यास मात्र चाळीसगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, अपर जिल्हाधिकारी कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच वीज वितरण कंपनीला नवीन पर्यायी जागा शोधण्याचे मोठे आव्हान आता शासन प्रशासनापुढे निर्माण होणार आहे. दरम्यान याबाबतीत उन्मेष पाटील यांनी 16 दिवसाची मुदत प्रशासनाला दिलेली असल्याने प्रशासनाच्या भूमिकेकडे तालुकवासीयांचे लक्ष लागले आहे. तसेच उन्मेष पाटील देखील सदर जागेच्या संदर्भात भविष्यात काय पाऊल उचलतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChalisgaonIs the location of the Additional District and Sessions Court in Bilakhed Shivara illegal? Former MP Unmesh Patil's claim creates a stir

Related Posts

जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 सप्टेंबर 2026 !

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 सप्टेंबर 2026 !

September 7, 2026
जळगाव

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

September 6, 2026
Next Post

आठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा गळा दाबून खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे सुप्रसिद्ध शिव व्याख्याते प्रदीप देसलेंचे शिवजयंती निमित्ताने उद्या जाहीर व्याख्यान

February 21, 2025

सरकारविरोधात लेखन केले म्हणून पत्रकारावर गुन्हा नको : सर्वोच्च न्यायालय !

October 5, 2024

जळगाव दूध संघ प्रकरणी ‘जैसे थे’चा निर्णय ; प्रशासक की, संचालक मंडळ?, जाणून घ्या…हायकोर्टाचा निर्णय !

August 1, 2022

अबब ! राजभवनाच्या खर्चात १८ कोटींची वाढ ; आरटीआयच्या माहितीत उघड

May 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group