मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईच्या गोरेगावमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेट प्रकरणी मुंबई पोलिसांनी पोलिसांनी एका बॉलिवूड अभिनेत्रीसह ३ मुलींना अटक केली आहे.
पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या टीमने शुक्रवारी संध्याकाळी उशिरा पंचतारांकित हॉटेलमध्ये छापेमारी केली. यावेळी पोलीस ग्राहकांच्या वेशात गेले होते. जिथे त्यांना सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी छापेमारी केली. घटनास्थळावरून ३ महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर तिघांना अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये एका बॉलिवूड अभिनेत्रीचाही समावेश आहे. बॉलिवूडच्या एका आंतरराष्ट्रीय बेली डान्सर आणि दोन टीव्ही मालिका करणाऱ्या अभिनेत्रींवर या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटसाठी १० लाखांची डिल केली होती.