जळगाव (प्रतिनिधी) दूध संघातील अपहारप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. परंतू आता लिमयेंविरुद्ध पोलिसात आणखी एक तक्रार देण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या तक्रारीत जगदीश बढे यांना बिनविरोध काढण्यासाठी खोटे दाखले देत आपली फसवणूक केल्याचा आरोप तक्रारदार ठकसेन भास्कर पाटील (रा. चिनावल ता. रावेर) यांनी केला आहे. त्यामुळे आता जोरदार राजकीय हालचालींना वेग आला आहे.
दूध संघातील सुमारे अपहारप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह यांच्यासह हरी रामू पाटील, किशोर काशिनाथ पाटील आणि अनिल हरिशंकर अग्रवाल यांना शहर पोलिसांनी सोमवारी रात्री ११ वाजता अटक केली. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक शक्यता आहे. दरम्यान, सध्या दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, त्याआधीच अटकसत्र राबविण्यात आले. दुसरीकडे आता खडसे गटाचे जगदीश बढे यांना बिनविरोध काढण्यासाठी खोटे दाखले देत आपली फसवणूक केल्याचा आरोप तक्रारदार ठकसेन पाटील यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. कारण यानिमित्ताने बढे यांच्या बिनविरोध निवडीला न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.
ठकसेन भास्कर पाटील यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वसंत सरकारी दूध उत्पादक सोसायटी मर्या चिनावल या संस्थेमार्फत तालुका प्रतिनिधी म्हणून नामनिर्देशन पत्र जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघसाठी भरलेला होता. नामनिर्देशन पत्र भरतेवेळी जो दूध पुरवठा लागत होता, त्याचा दाखला काढला होता. त्यामध्ये 365 दिवसांचा दूध पुरवठा त्यांनी खालील प्रमाणे दि. ७ नोव्हेंबर रोजी दिला. त्यानुसार दुध पुरवठा २०१९-२० ८९७५१ लिटर, २०२०-२१ ४८३१ लिटर, २०२१-२२ ४२६३८ लिटर याप्रमाणे दिला. त्यानंतर ठकसेन पाटील यांनी नामनिर्देशक पत्र १० नोव्हेंबर रोजी दाखल केले. तर दुसऱ्या दिवशी ११ नोव्हेंबर रोजी त्यांना दूध पुरवठा कमी असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ठकसेन पाटील यांनी स्थानिक संस्थेत तपास केला असता दूध पुरवठा २०१९-२० १६१५२९ लिटर, २०२०-२१ ८६९८४ लिटर, २०२१-२२ ८१०६० या प्रमाणे आढळून आला.
जिल्हा दूध संघात ओरड केल्याने मला योग्य दाखला देण्यात आला अशा प्रकारे माझे नामनिर्देशन पत्र रद्द करून विद्यमान संचालक जगदीश बाळू बढे यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी कार्यकारी संचालक यांनी खोटे दाखले देऊन माझी फसवणूक केल्याचे दिसून आले आहे. तरी कार्यकारी संचालक डॉक्टर लिमये व सहकाऱ्यांनी विरुद्ध कायदेशीर कारवाई करून मला न्याय मिळवून द्यावा असेही ठकसेन पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणात आपली सरळ-सरळ फसवणूक झाली आहे. आपण मध्यरात्री पोलिसात तक्रारी अर्ज दिला आहे. तसेच जगदीश बाळू बढे यांच्या बिनविरोध निवडीविरुद्ध आपण अपिलात जाणार आहोत. न्यायालयातही दाद मागू.
– ठकसेन पाटील ( तक्रारदार)