नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संसदेमध्ये साथरोग (सुधारणा) विधेयक, २०२० मंजूर झाले आहे. यानुसार साथीच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारे नियम अधिक सक्षम आणि कठोर करण्यात आले आहेत. रात्री १२ नंतरही सुरु असणाऱ्या चर्चेनंतर अखेर विधेयकाला मंजुरी मिळाली.
रात्री १२ नंतरही सुरु असणाऱ्या या चर्चेमध्ये अखेर विधेयकाला मंजुरी मिळाली. वरिष्ठ सभागृहामध्ये काही दिवसांपूर्वीच साथरोग (संशोधन) विधेयकाला मंजूरी मिळाली आहे. वरिष्ठ सभागृहामध्ये हे विधेयक अध्यादेश स्वरुपात आणण्यात आले. नवीन बदलांमुळे आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना हानी पोहचवणे, जखमी करणे किंवा जिवाला धोका निर्माण करणाऱ्या तसेच त्यांना कर्तव्य पार पाडण्यात अडथळा निर्माण करणाऱ्या, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संपत्तीला, कागदपत्रांना नुकसान पोहचवणाऱ्यांना शिक्षा आणि दंड करण्याचा नियम बनवण्यात आला आहे. या अंतर्गत सर्वाधिक पाच लाखांपर्यंतचा दंड आणि सात वर्षांपर्यंतचा तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.