मुंबई प्रतिनिधी । कॉंग्रेस खोटारडा असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शेतकरी विधेयकाबाबत काल कॉंग्रेस व त्याच्या मित्रपक्षांनी एकत्र जमले. देशाच्या संसदेत असे वर्तन कधी पाहिले नव्हते. कॉंग्रेस आणि त्याचे सहयोगी खालच्या स्तरावर काम करत आहेत. कॉंग्रेसचे शेतकर्यांवर कोणतेही प्रेम नाही. ते फक्त राजकारण करत आहेत असेही ते म्हणाले.
हमीभाव सरकार देणारच आहे असे पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय. जो कायदा तयार केलाय त्यात कंत्राटी पद्धतीने माल विकता येईल. खासगी क्षेत्रातील लोक शेतकऱ्याशी करार करुन माल विकत घेतील. लहान शेतकऱ्याला वाहतूक परवडत नाही, तो तंत्रज्ञान वापरत नाही. पण यामुळे साखळी तयार होईल. शेतकऱ्याने तयार केलेल्या मालावर त्याला ८ टक्के द्यावे लागत होते पण आता तस होणार नसल्याचे ते म्हणाले. काल संसदेने दोन बील पास केले ते पूर्णपणे शेतकरी हिताचे आहेत. यामुळे लहान शेतकऱ्यांना फायदा होईल. कोल्ड स्टोरेजमधून थेट माल विकता येत नव्हता. बाजार समितीत शेतकऱ्यांना कर द्यावा लागायचा. माल कुठे विकला जावा, किती किंमत असावी ? यावर शेतकऱ्यांचे नियंत्रण नव्हते. सिंगल मार्केट झाल्याने देशाच्या कोणत्या कोपऱ्यात माल विकायचा आणि किती किंमतीत विकायचा हे शेतकरी ठरवतील. त्यामुळे ही दोन्ही बीलं क्रांतीकारी असल्याचे फडणवीस म्हणाले.
खासगी एपीएमसी सध्या काम करतंय. कॉंग्रेसचा लोकसभेच्या जाहीरनाम्यात शेतमालाचे निर्बंध हटवणार असे म्हटलंय. शहरात मुक्त बाजार उघड्यात येतील, अत्यावश्यक वस्तू कायदा रद्द करणे असे जाहीरनाम्यात म्हटलंय. पण कॉंग्रेसने काल राजकारण म्हणून विरोध केलाय.