धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मोठा माळी वाडा येथील केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेली स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ही परीक्षा देऊन धरणगाव तालुक्यात प्रथम व (सीआयएसएफ जवान) या पदावर समाधान गजानन महाजन यांनी नियुक्ती झाल्याने कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने निवासस्थानी जाऊन त्यांचा शाल श्रीफळ व भारत मातेची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरणगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय संतोष पवार, ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन,कर्तव्य बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील चौधरी, माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नामदेव माळी,निलेश महाजन मान्यवर उपस्थित होते. समाधान महाजनांनी मनोगत व्यक्त करतांना परिस्थितीच्या विरुध्द दिशेने लढत देत वय वर्ष पाच असताना पितृछत्र हरपले व स्वत:च्या मालकीचे घर शेती नसतांनाही लहानपणी मेळेल ते काम करून उदर निर्वाह करून आपला संघर्ष सुरू ठेवला. माझ्या यशाचे संपूर्ण श्रेय माझी आई तसेच पाहुणे,माऊशी, मामा व संपूर्ण तिरंगा अकॅडमी मित्र परिवाराला जाते, असे महाजनांनी म्हटले. सूत्रसंचालन रामनाथ माळी,यांनी केले तर आभार निवृत्ती माळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अक्षय सोनवणे, डीगंबर महाजन, अमोल महाजन,मनीष चौधरी, संपुर्ण तिरंगा अकॅडमी मित्र यांनी परिश्रम घेतले.