मुंबई (वृत्तसंस्था) सप्टेंबर २०१८ मध्ये मी सुशांतच्या संपर्कात आलो आणि त्याच्या सांगण्यावरुन सोबत राहू लागलो. दोन-तीन दिवसातच तो ड्रग्ज घेत असल्याचे माझ्या लक्षात आल्याची माहिती सुशांचा नोकर दीपेश सावंतने एनसीबीकडे दिल्याची माहिती समोर येत आहे.
दीपेशने चौकशीत पुढे सांगितले की, आपण कधीच ड्रग्ज आणून दिले नाही. मला मोफत काम करायला सांगितले आणि नंतर काढून टाकण्यात आले. त्यानंर जानेवारी २०२० मध्ये सुशांतचा फोन आला. सुशांत अभिनय सोडून लोणावळ्याला शिफ्ट व्हायच्या विचारात होता. मी पुन्हा काम कराव अशी त्याची इच्छा होती असेही दीपेशने एनसीबीला सांगितले. दरम्यान, एनसीबीकडून दीपेशला सरकारी पुरावा म्हणून सादर करण्यात येणार असल्याचे देखील वृत्त आहे.