मुंबई (वृत्तसंस्था) सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिल्यानंतर त्याचे काय झाले ? लोकं विचारतात की सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? आम्ही देखील सीबीआयच्या तपासाची आतुरतेने वाट बघत आहोत, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
अनिल देशमुख यांनी सोमवारी मीडियाशी बातचीत बोलतांना म्हणाले की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस चांगल्या पद्धतीने करत होते. पण, अचानक त्यांच्याकडून तपास काढून सीबीआयच्या हाती सोपवण्यात आला. मला अनेकजण विचारतात सुशांतने आत्महत्या केली, की त्याची हत्या झाली. मीदेखील सीबीआय तपास कुठपर्यंत आला, याची आतुरतेने वाट पाहत आहे. दिड महिन्यापासून सीबीआय सुशांत प्रकरणाचा तपास करत आहे. त्यांचा तपास कुठपर्यंत आला, त्यांना यात कोणत्या गोष्टी हाती लागल्या, याची आम्हीदेखील आतुरतेने वाट पाहत आहोत, असे देशमुख म्हणाले.