जळगाव (प्रतिनिधी) एमआयडीसीतील कृष्णा पीपटीन कंपनीत ७ ऑक्टोबर रोजी गरम पाण्याच्या टाकीत पडल्याने जखमी झालेल्या एकाचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
यासंदर्भात अधिक असे की एमआयडीसीतील कृष्णा पिटन कंपनी येथील गरम पाण्याच्या टाकीत समाधान हरिभाऊ पनाड (वय ५०, रा. रामेश्वर कॉलनी) हे काम करत असताना ७ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास अचानक पाण्याच्या टाकीत पडले होते. गंभीर अवस्थेत त्यांना अपेक्स एशियन क्रिटिकल केअर सेंटर अॅड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर मागील दिवसापासून रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतू आज पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासंदर्भात डॉ. अभिजित चौधरी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास पो.हे.का अतुल पाटील हे करीत आहे.