नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या २४ तासांत देशात ९२ हजार ६०५ नवीन करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत तर एक हजार १३३ जणांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ५४,००,०४४ इतकी झाली आहे. यापैकी १० लाख १० हजार ८२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ८६ हजार ७५२ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशातील करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही दररोज वाढत आहे. देशातील करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८० टक्केंच्या जवळ पोहचले आहे. देशात आतापर्यंत ४३ लाख ३ हजार ४४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. दरम्यान, शनिवारी देशात १,१४९ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.