जळगाव (प्रतिनिधी) तहसीलदार वैशाली हिंगे यांनी आपल्या नंदुरबार येथील बदली विरोधात मॅटमध्ये धाव घेतली होती. परंतू आज मॅटने सौ.हिंगे यांची याचिका फेटाळून लावली. तर त्रयस्त अर्जदार सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांचा बदलीला स्टे देऊ नये, यासाठीचाही अर्ज मॅटने फेटाळून लावला आहे.
सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी केलेल्या तक्रारींमुळे तहसीलदार वैशाली हिंगे यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. याच वादातून राज्य शासनाने हिंगे यांची नंदुरबार येथील नर्मदा सरोवर येथे बदली केली होती. परंतू हिंगे यांनी या विरोधात मॅटकोर्टात धाव घेत बदलीला स्थगिती मिळावी, अशी मागणी केली होती. परंतू आत सोमवारी मॅट कोर्टाने त्यांची मागणी फेटाळून लावली. तर त्रयस्थ अर्जदार अर्जदार माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक कुमार गुप्ता यांचीदेखील याचिका कोर्टाने फेटाळून लावली.
















