नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मागील २४ तासांमध्ये ८६ हजार ९६१ नवे कोरोनाबाधित आढळले असून, १ हजार १३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५४ लाख ८७ हजारांच्या पुढे पोहचली आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे. त्यात म्हटले आहे की, देशभरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५४ लाख ८७ हजार ५८१ वर पोहचला आहे. तर एकूण कोरोनाबाधितांमध्ये १० लाख ३ हजार २९९ अॅक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज मिळालेले ४३ लाख ९६ हजार ३९९ व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ८७ हजार ८८२ जणांच्या संख्येचा समावेश आहे. दुसरीकडे भारतात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही जास्त आहे. भारताने नुकतेच रिकव्हरी रेटमध्ये अमेरिकेलाही मागे टाकले होते. भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर अमेरिकेपेक्षाही अधिक झाला आहे. त्यामुळे कोरोना रिकव्हरी रेटमध्ये भारत अव्वल स्थानी आला आहे. तर भारतातील करोनामुक्त झालेल्यांच्या संख्येने ४३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.