जळगाव (सुरेश उज्जैनवाल) आर्थिक संकटात असलेल्या तालुक्यातील फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके कडून विक्रीस काढण्यास येणार असल्याने कारखान्याची विक्री न करता तो भाडेतत्त्वावर चालविण्यास द्यावा, या मागणीसाठी मधुकर सहकारी साखर कारखाना साइटवर 29 जून रोजी सकाळी अकरा वाजेला कारखाना सभासदांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ताब्यात असलेला तालुक्यातील मधुकर सहकारी साखर कारखाना विक्री केला जाणार असल्याचे वृत्त येत असल्याने कारखान्याच्या सर्व सभासदांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कारखाना ताब्यात घेण्यापूर्वी कारखाना भाडेतत्त्वावर देण्यात येणार असल्याचे, बँकेकडून सभासदांना आश्वासित केले होते मात्र सध्या बँक भाडेतत्वावर देणे ऐवजी विक्री काढणार असल्याचे , वृत्त असल्याने कारखान्याचे माजी कामगार प्रतिनिधी गिरीश भास्कर कोळंबे व कारखाना सभासद विजय प्रेमचंद पाटील यांनी दिनांक 29 जून रोजी कारखाना साइटवर सभासदांची बैठक आयोजित केली आहे बैठकीस सर्व सभासदांनी व कामगारांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
ता.क. सुरेश उज्जैनवाल हे मुक्त पत्रकार आहेत.
मोबाईल : 88888 89014