TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : शिंदे गटाला विधानसभा उपाध्यक्षांचा मोठा धक्का ; म्हणाले, पक्षप्रमुखानं गटनेता निवडायचा असतो !

अपक्षांची मतं गृहीत धरली जाणार नसल्याचेही केले स्पष्ट!

The Clear News Desk by The Clear News Desk
June 23, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि समर्थकांनी नवा गट स्थापन करण्याबाबत पाठिंबा असलेल्या आमदारांचं पत्र पाठवलं आहे. यावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कायद्यात पक्षप्रमुखाने गटनेता निवडायचा असतो आणि गटनेत्याने प्रतोद निवडायचा असतो, असं झिरवळ म्हणाले. तसेच अपक्ष आमदारांची मतं गृहीत धरली जाणार नाही, असंही स्पष्ट केलं.

शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वाढता प्रतिसाद मिळताना दिसत आहे. माझ्यासोबत ४६ आमदार आहेत आणि आणखी १० आमदार येतील, असा दावा शिंदेंनी काल गुवाहाटीच्या विमानतळाबाहेर केला. यानंतर आज सेनेचे सहा आमदार गुवाहाटीला गेले आणि शिंदेंच्या गटात सामील झाले. आपल्यासोबत सेनेचे दोन तृतीयांश आमदार असल्यानं गटनेतेपदी अजय चौधरी यांची नेमणूक बेकायदेशीर असल्याचा दावा शिंदेंनी केला. आता यावर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी भाष्य केलं आहे.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

एकनाथ शिंदेंनी गटनेतेपदावर दावा करणारं पत्र पाठवलं. मात्र त्यावरील सहीवर आमदार नितीश देशमुख यांनी आक्षेप घेतला आहे. मी इंग्रजीत सही करतो. मात्र पत्रावर माझ्या नावे करण्यात आलेली स्वाक्षरी मराठीत असल्याचा देशमुखांचा दावा आहे. त्यामुळे मला हे प्रकरण तपासावं लागेल, असं झिरवळ म्हणाले. बंड केल्यानंतर शिवसेनेनं एकनाथ शिंदेंना गटनेतेपदावरून हटवलं आणि अजय चौधरी यांची नियुक्ती केली. यावर शिंदेंनी आक्षेप घेतला. दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा आमच्याकडे आहे. त्यांना चौधरी यांची नियुक्ती मान्य नाही. त्यामुळे चौधरी यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा दावा शिंदेंनी केला. शिंदे गटानं शिवसेनेचे विधिमंडळ मुख्य प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती केली आहे.

अपक्षांची मतं गृहीत धरली जाणार नाही

“विशिष्ट गट स्थापन करण्याचं जे पत्र माझ्याकडे आलं आहे त्यावर ३०-३२ आमदारांच्या सह्या आहेत त्यातही संशय आहे. आमदार नितीन देशमुख यांनी ते इंग्रजी स्वाक्षरी करतात आणि पत्रावर त्यांच्या नावासमोर मराठीत स्वाक्षरी आहे असं म्हटलं आहे. त्यामुळे त्यावर तपासणी करावी लागेल. त्यावर अपक्ष आमदारांच्या सह्या असतील तर त्यांना त्याबाबत अधिकार आहे का याचाही विचार करावा लागेल. शिवसेना पक्ष म्हणून अपक्षांची मतं त्यात गृहीत धरली जाणार नाही,”

कायद्यात पक्षप्रमुखाने गटनेता निवडायचा असतो

“कायद्यात पक्षप्रमुखाने गटनेता निवडायचा असतो आणि गटनेत्याने प्रतोद निवडायचा असतो. याप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधी एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदी निवडलं होतं, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजय चौधरी यांना गटनेतेपदी नियुक्तीचं पत्र दिलं,” अशी माहिती नरहरी झिरवळ यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

न मागता पैसे पाठवून तरूणाला ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न ; धरणगाव पोलिसात तक्रार !

October 12, 2023

मुलींच्या पहिल्या शाळेला ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करण्याची मागणी

September 6, 2020

धरणगाव येथील गुड शेपर्ड स्कुलमध्ये ‘आजादी का अमृत महोत्सव’ उत्साहात साजरा !

August 15, 2022

आ. संजय सावकारे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट ; पैशांची मागणी !

August 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group