भोपाळ (वृत्तसंस्था) मध्यप्रदेशातील खरगौनमधील झिरन्या भागात एका अल्पवयीने मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पिडीत अल्पवयीन मुलगी आपल्या भावाबरोबर शेतीची राखण करण्यासाठी आली होती. शेताची राखण करणाऱ्या मुलीवर तीन जणांनी बलात्कार केला. पाणी पिण्याच्या बहाण्याने आरोपी शेतावर आले होते. भावाला मारहाण करत ओपींनी त्याच्या बहिणीला पळवून घेऊन गेले आणि अत्याचार केला. दरम्यान, उत्तर प्रदेशातील हाथरस येथील गरीब तरूणीच्या बलात्काराची घटना ताजी असतानाच राज्यातील बलरामपूरमध्ये सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याची घटना समोर आली आहे.