साकळी ता.यावल (प्रतिनिधी) २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्याबाबत शासन निर्णय झालेला आहे. मात्र या दिनाचा यावल प्रशासनाला विसर पडला आहे. त्यामुळे या दिनानिमित्त किमान विविध शासकीय कार्यालयांमध्ये फलक लावले जावे, अशी मागणी युवक काँग्रेसने तहसीलदारांकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
सोमवारी येथील तहसील कार्यालयात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. तहसील कार्यालयसह इतर कार्यालयात या निमित्ताने जनजागृतीपर फलक, बोर्ड लावण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तहसीलदार जितेंद्र कुवर यांना निवेदन देते वेळी तस्लिम शेख गनी पिंजारी, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इमरान पहेलवान, राजू पिंजारी, रहेमान शेख आदी उपस्थित होते.