नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रातील मोदी सरकारने चीन स्थित बँकेकडून मोठे कर्ज घेतलेय, असा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लावला आहे. ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, तुम्ही क्रोनोलॉजी समजून घ्या; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणीही नियंत्रण रेषा ओलांडली नाही असे वक्तव्य केले. त्यानंतर चीन स्थित बँकेकडून मोठे कर्ज घेतले. त्यानंतर संरक्षण मंत्र्यांनी चीनने आपली जमीन बळकावली असल्याचे सांगितले. आणि आता केंद्रीय गृहराज्यमंत्री म्हणतात घुसखोरी झालीच नाही. ट्विटच्या शेवटी राहुल गांधी यांनी मोदी सरकार भारतीय लष्करासोबत आहे की चिनी? अशी विचारणा केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी अधिवेशनात अनुपस्थित असले तरी सतत केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना दिसत आहेत.