भुसावळ (प्रतिनिधी) सेंट्रल रेल्वे स्कूलच्या वार्षिक नियतकालिक ‘सृजन’चे प्रकाशन शुक्रवार रोजी डी.आर.एम विवेक कुमार गुप्ता यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी सिनीअर डी.पी.ओ एन.डी.गांगुर्डे, रेल्वे स्कूलचे प्राचार्य सतीश कुलकर्णी, संपादक संतोषकुमार उपाध्याय,कला शिक्षक आर.पी. जावळे आदी उपस्थित होते. विद्यालयाने गेल्या ३१ वर्षापासून वार्षिक नियतकालिक प्रकाशित करण्याची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी त्यांच्या सृजनशीलतेला चालना मिळण्यासाठी दर वर्षी प्रकाशित केले जाते. यात विद्यार्थ्यांनी लिहिलेले लेख, कविता, शब्दकोडे, प्रश्नमंजुषा असे विविध साहित्य प्रकाराने सजलेले सृजन निश्चितच विद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे. तसेच विद्यालयातील विविध उपक्रमांची छायाचित्रे, यशस्वी विद्यार्थ्यांची छायाचित्रे सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा दायी ठरतात