मुंबई प्रतिनिधी । भारतीय स्टेट बँकेने सांगितले आहे की, यावर्षी 14 हजार नियुक्तीची मोठी योजना आखणार आहे. स्टेट बँकेने सांगितल्याप्रमाणे, आपला व्यवहार अधिक विस्तारीत करण्यासाठी त्यांना आणखी काही लोकांची आवश्यकता आहे तसेच बँकेने असे देखील स्पष्टीकरण दिले आहे की, वीआरएस स्कीम कॉस्ट कटिंगकरता नाही आहे. या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध नाही.
देशातील सर्वात मोठी बँक म्हणून एसबीआयकडे पाहिले जाते. स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना म्हणजे बँकेतील उपस्थिती कमी करण्यासाठी नाही आहे. आधीच्या माहितीनुसार, बँकेने कर्मचाऱ्यांकरता योजना आणली आहे. यामध्ये जवळपास 30 हजार 190 कर्मचारी येऊ शकतात. या दरम्यान पीटीआयला बँकेच्या प्रवक्तांनी सांगितल्यानुसार, बँकेचा विस्तार वाढवण्यासाठी ही योजना नाही.