TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

३५ हजार वीज कामगारांचा खाजगीकरणाविरोधात विधिमंडळ अधिवेशनावर धडकला मोर्चा !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 23, 2022
in जळगाव, जिल्हा प्रशासन, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शासनाच्या मालकीच्या महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचा घाट सरकारने घातला आहे. या धोरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य वीज कामगार, अभियंते, अधिकारी संघर्ष समितीच्या वतीने नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर शुक्रवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चात खान्देशासह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील ३५ हजारांहून अधिक वीज कर्मचारी सहभागी झाले.

वीज कामगार बेमुदत संपावर जाण्याचा इशारा !

READ ALSO

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

इंदोरा चौक येथून सकाळी ११ वाजता प्रचंड घोषणा देत हजारो वीज कामगार,अधिकारी, अभियंते व कंत्राटी कामगार यांनी प्रचंड मोर्चा काढला. पोलिसांनी एलआयसी चौकामध्ये मोर्चा अडवल्यानंतर संघर्ष समितीमध्ये सहभागी संघटनांचे पदाधिकारी मोहन शर्मा, संजय ठाकूर, कृष्णा भोयर, शंकर पहाडे, आर.टी.देवकांत, सय्यद जहिरोद्दीन, दामोदर चंगोले, राजन भानुशाली, राजेश कठाळे, मधुकर सुरवाडे, एच.के.लोखंडे, संजय खाडे, नवनाथ पवार, प्रभाकर लहाने, दत्तात्रय गुट्टे, उत्तम पारवे, ललित शेवाळे, प्रकाश गायकवाड, स्नेहा मिश्रा, विठ्ठल भालेराव, शिवाजी वायफळकर या पदाधिकाऱ्यांनी मोर्चाला संबोधित केले. विद्युत कंपन्याचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील वीज ग्राहकांच्या हितासाठी वीज कामगार बेमुदत संपावर जातील, असा इशारा सर्व नेत्यांनी दिला. या मोर्चाला आमदार प्रकाश ठाकरे (नागपूर), आमदार राजू पाटील (परभणी) यांनी संबोधित करून वीज कामगारांच्या मागण्यांस पाठिंबा दिला.

समान काम-समान वेतन लागू करावे !

वीज कंपन्यात कार्यरत ३० संघटनांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तिन्ही कंपन्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे खाजगीकरण सहन करणार नाही. जनतेच्या मालकीच्या या सार्वजनिक वीज कंपन्या जनतेच्या मालकीच्या राहिल्या पाहिजेत. नफा कमविण्याच्या उद्देशाने येणाऱ्या खाजगी भांडवलदारांना वीज कंपन्या सोपवण्यात येऊ नयेत. अदानी या खाजगी भांडवलदार कंपनीने महावितरण कंपनीचे कार्यक्षेत्र असलेल्या भांडुप परिमंडळातील ठाणे व वाशी मंडळात समांतर वीज वितरणाचा परवाना विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेला आहे, त्यास तीव्र विरोध करण्यात आला. तिन्ही वीज कंपन्यांत रिक्त असलेली ४० हजार पदे तात्काळ भरावी, तिन्ही कंपन्यांमध्ये काम करणारे कंत्राटी व आऊटसोर्सिंग कामगार यांना वीज कंपन्यांच्या सामावून घ्यावे, समान काम-समान वेतन लागू करावे, एनपॅनलमेंटद्वारे ठेकेराकडून करण्यात येणारी कामे बंद करावे.करावीत, अशा मागण्या यावेळी मोर्चेकऱ्यांनी केल्या.

शिष्टमंडळाची आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशी चर्चा
दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळास चर्चेला बोलावले. चर्चेमध्ये कामगार संघटनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, वीज उद्योगांमध्ये कोणतेही प्रकारचे खाजगीकरण कामगार संघटना सहन करणार नाहीत. हा विषय राज्यातील जनतेचा हिताचा असल्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी यामध्ये लक्ष घालावे व संभाव्य खाजगीकरण थांबवावे, अशी आग्रही भूमिका मंत्र्यांच्या पुढे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मांडली. त्यावर सावंत म्हणाले की, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सध्या नागपूरमध्ये नाहीत. सोमवारी ते आल्यानंतर त्यांच्या कानावर आपला विषय मांडतो. या विषयावर तात्काळ ऊर्जामंत्री यांच्या पातळीवर स्वतंत्र बैठक आयोजित करण्याची विनंती करतो, असे आश्वासन सावंत यांनी दिले. दरम्यान, जोपर्यंत या विषयावर चर्चा होत नाही, तोपर्यंत संघर्ष समितीने जाहीर केलेले आंदोलन सुरू राहील, असे यावेळी शिष्टमंडळाने स्पष्टपणे सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

February 10, 2026
जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
Next Post

'चार भिंती' चित्र प्रदर्शंनातून पद्मश्री भवरलालजैन यांना आदरांजली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“ठाकरे सरकार कोरोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरून करतंय” : अतुल भातखळकर

April 18, 2021

स्वस्त धान्य दुकानदारांचे धरणगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन !

February 9, 2023

धरणगावातील श्री स्वामी समर्थ केंद्रात चोरी ; दानपेटी पळविण्याचा प्रयत्न !

October 27, 2023

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करा ; निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

November 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group