मुंबई (वृत्तसंस्था) भाजपला रामराम ठोकणारे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसेंचे स्वागत केले.
थोड्याच वेळापूर्वी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबई येथील एका भव्य कार्यक्रमात त्यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षातर्फे याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील कार्यालयात आज एकनाथराव खडसे यांनी पक्षात प्रवेश घेतला. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड इत्यादी नेते उपस्थित होते. तर जळगाव जिल्ह्यातील आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, संजय गरुड, हाजी गफ्फार मलिक, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार संतोष चौधरी, रवींद्रभैय्या पाटील, अभिषेक पाटील आदी नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जय्यत तयारी. सभागृहात फक्त ५० लोकांना प्रवेश दिला गेला होता. एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्यानंतर अनेक समीकरण बदलताना पाहायला मिळत आहेत. भाजप नेते एकनाथ खडसे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होत आहे. त्यांची कन्या रोहिणी खडसे यदेखील मुंबईत उपस्थित राहणार आहेत. तर एकनाथ खडसे यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली आहे.