मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना नेहमी पहाटेच्या बीजेपी-राष्ट्रवादीच्या शपथविधीवर टीका करते. अजितदादा पवार पहाटे पहाटे गव्हर्नर बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय?? त्यांच्याजवळ आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले. पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित दादा पवारांनीच केला, अशा आशयाचे ट्वीट करून भाजपाचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.
शिवसेनेकच्या मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील आजच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांना ‘पहाटेचे मुख्यमंत्री’ असे म्हणूनही हिणवले. फडणवीसांचे हे सरकार वाचवण्यासाठी राज्यातील काही अधिकारी राबले होते. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीत राहता यावे म्हणून काही पोलीस अधिकारी लहान पक्षांच्या आमदारांना व अपक्षांना वेगवेगळ्या पद्धतीनं जाळ्यात ओढत होते. आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करत होते. गुप्तचर खात्यानंही याकामी विशेष कामगिरी बजावली. बहुमत सिद्ध करण्याची जबाबदारी शिरावर घेऊनच काही अधिकारी राबत होते,’ असा आरोप शिवसेनेने केला होता. त्यावर निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, शिवसेना नेहमी पहाटेच्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या शपथविधीवर टीका करते. परंतु उपमुख्यमंत्री आणि राष्टवादीचे नेते अजित पवार पहाटे- पहाटे राज्यपालांच्या बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते का, असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच अजित पवार यांच्याकडे त्यावेळी आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवार यांनीच केला, असेही निलेश राणे यांनी म्हटले आहे.
शिवसेना नेहमी पहाटेच्या बीजेपी NCP शपथविधीवर टीका करते. अजित दादा पवार पहाटे पहाटे गव्हर्नर बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय?? त्यांच्याजवळ आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले. पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित दादा पवारांनीच केला.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 21, 2020