TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले ७५ टक्क्यांवर ; 33 हजार रुग्णांची कोरोनावर मात

The Clear News Desk by The Clear News Desk
September 21, 2020
in आरोग्य, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात एकाच दिवसात (20 सप्टेंबर) 605 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत 32 हजार 941 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.04 टक्क्यांवर पोहोचले आहे. जिल्ह्यात सध्या 9 हजार 860 ॲक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असून पैकी 3 हजार 494 रुग्ण गृह अलगीकरणात आहेत. जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आतापर्यंत 1 लाख 83 हजार 808 संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून ॲक्टीव्ह रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

 

READ ALSO

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपापयोजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दैनंदिन चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आली असून लक्षणे जाणवताच नागरीकांनी तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात आरटी-पीसीआरद्वारे 86 हजार 926 तर रॅपिड ॲन्टीजेन टेस्टद्वारे 96 हजार 882 अशा एकूण 1 लाख 83 हजार 808 तपासण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 1 लाख 38 हजार 63 चाचण्या निगेटिव्ह तर 43 हजार 897 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून इतर अहवालांची संख्या 1 हजार 88 असून 760 अहवाल प्रलंबित आहेत.

जिल्ह्यात सध्या 9 हजार 860 बाधित रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी कोविड केअर सेंटरमध्ये 4 हजार 890 रुग्ण, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 807, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 669 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 3 हजार 494 रुग्ण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. शिवाय विलगीकरण कक्षातही 438 रुग्ण आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे नसलेले 8 हजार 384 रुग्ण असून लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 476 इतकी आहे. यापैकी 669 रुग्णांना ऑक्सिजन वायू सुरु असून 287 रुग्ण हे आयसीयुमध्ये दाखल आहे.

जिल्ह्यात आज एका दिवसात 596 पॉझिव्टिह रुगण आढळल्याने आतापर्यतच्या बाधित रुग्णांची संख्या 43 हजार 897 इतकी झाली आहे. यापैकी 32 हजार 941 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात आज एका दिवसात 16 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून आतापर्यंत 1 हजार 96 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा मृत्युदर हा 2.50 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात प्रशासनास यश आले आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी सीसीसी व इतर रुग्णालयांमध्ये 12 हजार 854 इतके बेड आहेत. यात 263 आयसीयू बेड तर 1 हजार 643 ऑक्सिजनयुक्त बेडचा समावेश आहे.

जिल्ह्यात तालुकानिहाय आतापर्यंत आढळून आलेले बाधित रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 43 हजार 897 इतकी झाली आहे. यामध्ये जळगाव शहर 9814, जळगाव ग्रामीण 2238, भुसावळ 2689, अमळनेर 3836, चोपडा 3686, पाचोरा 1707, भडगाव 1698, धरणगाव 1951, यावल 1447, एरंडोल 2623, जामनेर 3099, रावेर 1808, पारोळा 2235, चाळीसगाव 2844, मुक्ताईनगर 1180, बोदवड 708, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात असलेल्या 334 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात तालुकानिहाय आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या

जळगाव शहर 6799, जळगाव ग्रामीण 1431, भुसावळ 1898, अमळनेर 3030, चोपडा 2409, पाचोरा 1539, भडगाव 1491, धरणगाव 1552, यावल 1162, एरंडोल 1846, जामनेर 2396, रावेर 1320, पारोळा 1709, चाळीसगाव 2495, मुक्ताईनगर 1122, बोदवड 524, इतर जिल्ह्यातील 218 याप्रमाणे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 32 हजार 941 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

जिल्ह्यात तालुकानिहाय उपचार घेत असलेल्या (ॲक्टिव्ह) रुग्णांची संख्या

जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेले 9 हजार 860 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. यामध्ये जळगाव शहर 2786, जळगाव ग्रामीण 733, भुसावळ 669, अमळनेर 716, चोपडा 1209, पाचोरा 102, भडगाव 167, धरणगाव 353, यावल 233, एरंडोल 736, जामनेर 637, रावेर 406, पारोळा 509, चाळीसगाव 282, मुक्ताईनगर 32, बोदवड 174, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 116 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात तालुकानिहाय उपचारादरम्यान मृत्यु झालेल्या रुग्णांची संख्या

जिल्ह्यात आतापर्यत उपचारादरम्यान 1 हजार 96 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यामध्ये जळगाव शहर 229, जळगाव ग्रामीण 74, भुसावळ 122, अमळनेर 90, चोपडा 68, पाचोरा 66, भडगाव 40, धरणगाव 46, यावल 52, एरंडोल 41, जामनेर 66, रावेर 82, पारोळा 17, चाळीसगाव 67, मुक्ताईनगर 26, बोदवड 10 मृतांचा समावेश आहे. उपचारादरम्यान एकूण मृत्यु झालेल्या 1 हजार 96 रुग्णांपैकी 956 मृत्यु हे 50 पेक्षा जास्त वयोगटातील असून 508 मृत्यु हे आजारपण असलेले आहेत.

जिल्ह्यातील 5 हजार 22 ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

कोरोना बाधित रुग्ण आढळलेला भागाचे निर्जतुकीकरण करणे तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांची तपासणी करण्यासाठी हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 5 हजार 22 ठिकाणे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 2 हजार 279, शहरी भागातील 1 हजार 280 तर जळगाव महापालिका क्षेत्रातील 1 हजार 463 ठिकाणांचा समावेश आहे. या क्षेत्रांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी 6 हजार 236 टिम कार्यरत आहे. या क्षेत्रात 2 लाख 54 हजार 476 घरांचा समावेश असून यात 11 लाख 10 हजार 910 इतकी लोकसंख्येचा समावेश आहे. अशी माहिती डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक तथा नोडल ऑफिसर कोविड-19, जळगाव यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

June 18, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
जळगाव

खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

May 20, 2026
गुन्हे

सबगव्हाण टोल नाक्यावर मुजोरी; जळगावच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

April 14, 2026
Next Post

माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिम यशस्वी करण्यासाठी आरोग्य पथकास सहकार्य करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात ; केंद्र सरकारचा निष्कर्ष

March 16, 2021

जळगाव जिल्ह्यात आज आढळले ६ कोरोनाबाधित, २ झाले बरे !

June 14, 2022

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा ; पोलिसांना अलर्ट जारी

October 27, 2020

ठाण्यात MIM कार्यालयावर हल्ला ; तलवारीसह लाकडी दांडक्याने कार्यकर्त्यांना मारहाण !

September 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group