जळगाव (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील लोहारी- वरखेडे गावाच्या दरम्यान माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या कारने एका दुचाकीस्वाराला उडविले. याप्रकरणी आ. महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जळगाव एनएसयूआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केली आहे.
या अपघातात वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी बी.सी. पवार हे जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्री असताना मागील पाच वर्षात कुठल्याही प्रकारचा जिल्ह्यामध्ये विकास काम केलेलं नसल्यामुळे आज रस्त्यांची दूर्दशा व रस्त्यांमध्ये केवळ आणि केवळ खड्डे ही फक्त माजी मंत्री गिरीश महाजन यांची जिल्ह्याला देण आहे भैया खड्ड्यांमुळे आधी सर्व जनता त्रस्त असतानाच आज माजी मंत्री गिरीश महाजन यांनी पराक्रमाची उंची गाठत स्वतःच्या गाडीने रस्त्यावर आपल्या कार्यावर जाणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांना चक्क गाडीने चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी एनएसयूआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केली आहे.