मुक्ताईनगर (प्रतिनिधी) ग्रामिण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, पत्रकार, समाजसेवक स्वतः चा जीव धोक्यात घालून कोरोनाच्या काळात काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उचंदा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र अंतुर्ली येथे रोहिणीताई खडसे-खेवलकर या अध्यक्षा असलेल्या संवेदना फाउंडेशन मुक्ताईनगरतर्फे मास्क सॅनिटाईजर प्रमाणपत्र देऊन कोरोना योद्धा म्हणून नुकताच गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थितांसोबत संवाद साधताना रोहिणी खडसे -खेवलकर म्हणाल्या कोरोना हा आजार इतर आजारांसारखा नाही. आजारपणात रुग्णांची काळजी घेण्यासाठी घरचे असतात. मात्र कोरोनाने सर्व चित्र बदललं आहे. रुग्ण कुटुंबापासून दूर असतात. त्यामुळे रुग्णांमध्ये एकटेपणाची भावना निर्माण होते. रुग्णालयात ते एकटे पडतात. नातेवाईक दिसत नाहीत, बोलणं होत नाही. नातेवाईकांनाही काय करावं हे कळत नाही. मात्र अशा वेळेस तुम्ही सर्व त्या रुग्णाची घरच्या व्यक्ती प्रमाणे काळजी घेतात. त्यांचे समुपदेशन करतात त्यामुळे कोरोना रुग्णांचे मनोबल वाढते. कोरोना होऊ नये म्हणून घ्यावयाच्या उपाययोजना घरोघरी जाऊन सांगत आहात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार थांबण्यास मदत होत आहे. आपले हे कार्य कौतुकास्पद आहे. आपल्या कार्याचा सन्मान व्हावा आणि त्याची प्रेरणा इतरांना मिळावी म्हणून आपला कोरोना योद्धा म्हणून आम्ही गौरव करत आहोत. आपण इतरांची काळजी घेत आहात परंतु या काळात स्वतःची पण काळजी घ्या,असेही रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी उपस्थित डॉक्टर नर्स आशा अंगणवाडी सेविका यांना आवाहन केले.
यावेळी डॉ.अमित घडेकर, डॉ.तुषार पाटील, डॉ.संदीप तायडे, डॉ.देशमुख,डॉ.भूषण देव, डॉ.विजय पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जि.प.सदस्य वैशाली तायडे, भाजप तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, प.स. सदस्य विकास पाटील, चंद्रकांत भोलाने, ताहेर खान पठाण, नरेंद्र दुट्टे, प्रशांत महाजन, अनिल पांडे, मोहन महाजन, जगदीश महाजन,मुनाफ शेख, उचंदा सरपंच शशिकला पाटील, सोमनाथ पाटील,सोमनाथ पाटील, सद्दाम शेख, विजय डांगे, सुरज चौधरी उपस्थित होते